hotelsunillamboti.com
Welcome to Hotel Sunil Lamboti

About Us

आशीर्वाद...

हॉटेल सुनील वेबसाइटवर आपले स्वागत आहे

सोलापूर-पुणे महामार्गावरील लांबोटी गावालगत असलेलं “हॉटेल सुनील ” म्हणजे खवय्यांचं हक्काच ठिकाण.या महामार्गावरून प्रवास करताना गाडी हमखास या हॉटेलकडे वळतेच.वाघमोडे कुंटुंबियाने अत्यंत कष्टाने,जिद्द अन मेहनतीने असंख्य अडचणींचा धैर्याने सामना करत हे हॉटेल सुरु केले.

सुरुवातीला या संपूर्ण कुटुंबाची गुजराण शेतीवर अवलंबून होती.शेतीच्या उत्पन्नावर घर भागवणे फार जिकरीचे होत होते.सर्व कुटुंबाने असा विचार केला कि छोटे-खानी हॉटेल सुरु करूया मग बाजूने चार पत्रे मारून वर झोपडीसारखे छत बनवून लहानसे हॉटेल सुरु केले. नंतर व्यवसायात जम बसल्यावर झोपडीचे रूपांतर मोठ्या हॉटेल मध्ये केले. दर्जेदार,गुणवत्तापूर्ण व अस्सल गावरान चव,स्वच्छता,उत्कृष्ट व्यवस्थापन ,ग्राहकांच्या हिताला व पसंतीला प्राधान्य देऊन तसेच काळाला धरून नाविन्यपूर्ण पदार्थ यामुळे हॉटेल सुनील मध्ये सतत ग्राहकांची वर्दळ असते.आपला व्यवसाय वाढवणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे मग वाघमोडे कुटुंबीयांनी पाकणी येथे हॉटेलची उभारणी केली.स्वतःच्या शेतात पिकवलेल्या सेंद्रिय पद्धतीच्या भाजीपाला व पशुधन असल्यामुळे हॉटेल मधील दुग्धजन्य पदार्थ देखील घरगुती पद्धतीप्रमाणे चविष्ट आणि रुचकर लागतात.

हॉटेल सुनीलच्या सुप्रसिद्ध अश्या “मक्याच्या चिवड्याची तर बातच न्यारी ओ” पार सातासमुद्रापार लोकप्रिय हाय हा घरगुती मसाल्यापासून बनलेला चिवडा.तसेच त्याबरोबर शेंगाचटणी अन सोलापूर च्या ज्वारीची कडक भाकरी हे सुद्धा तितकेच लोकप्रिय या दोन्ही पदार्थांची भुरळ तर अनेक मराठी-हिंदी चित्रपट व टीव्हीवरील कलाकारांना सुद्धा आहे.ग्राहकांशी नाते जोडणे त्यांची आवड- निवड,गुणवत्ता,उत्कृष्ट व्यवस्थापन कुटुंबीय व हॉटेल मधील सर्व कर्मचारी यांच्या अपार मेहनतीने आज हे हॉटेल तितकेच लोकप्रिय आहे.

 

आखडे स्वतः बोलतात....!

उत्पादने विकली
0 M+
दैनिक उत्पादन
3000 +
वर्षांचा अनुभव
+
5/5
One of the best tea is served here if anyone is travelling towrds solapur should experience the tea and there are various types of teas as well, we all liked it and awesome one. This is also called as Lamboti Hotel.
Abhijeet Raut

प्रमाणित उत्पादने

Click edit button to change this text. Lorem ipsum dolor sit amet

आम्ही विविध दर्जेदार सेंद्रिय उत्पादनांसह व्यवहार करतो!

Shopping Cart